करमाळ्यात दुचाकी एसटी बसची धडक, एक ठार तर एक जखमी

कुंभेज फाटा ते पोफळज रस्त्यावर बाबर वस्ती येथे हा अपघात झाला.

सोलापूर | दुचाकी आणि आणि एसटी बसचा समोरासमोर अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कुंभेज फाटा ते पोफळज रस्त्यावर बाबर वस्ती येथे झाला. यामध्ये जखमीस सोलापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बळीराम रामहरी वैद्य (वय 45) हे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर साधू नाना खोलासे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बस चालक गणेश तुळशीराम जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील मयत बळीराम रामहरी वैद्य व साधू नाना खोलासे हे कुंभेज फाटा ते केडगावकडे मोटारसायकल घेऊन जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एस टी बसने त्यांना धडक दिली. यावेळी मोटारसायकलवरील बळीराम वैद्य हे जागीच ठार झाले. तर साधू नाना खोलासे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान उपस्थितांनी उमरडचे विनोद बदे यांच्या खाजगी गाडीमध्ये करमाळ्याच्या दिशेने रवाना केले. रस्त्यात रुग्णवाहिका मिळाल्याने त्यात रुग्णांना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वैद्य यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले तर खोलासे गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत राजेद्र कुंडलिक वैद्य यांनी फिर्याद दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय शेळकांदे हे करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies