ऑफिस आणि हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचं संजय राऊतांवर टिकास्त्र; म्हणाली...

कंगना तिच्या ऑफिस आणि हनुमानाचा फोटो शेअर करत संजय राऊतांवर टिका केली आहे

मुंबई । खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र दसऱ्याच्या निमित्ताने कंगनाने पुन्हा आता संजय राऊतांवर निशाना साधला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कंगनाच्या पाली हिल्स येथील बेकायदेशीर बांधकामावर मनपाने तोड कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाने आज हनुमानाचा आणि तिच्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे असून, संजय राऊतांवर टिकास्त्र केले आहे.

कंगनानं ट्विट करत सांगितले आहे की, 'माझी तुटलेली स्वप्न आज तुमच्या डोळ्यासमोर हसत आहेत संजय राऊत. पप्पू सेना माझे घर तोडू शकते मात्र माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही. बंगला क्रमांक 5 आज सत्याचा असत्यावर विजय करीत आहे.' असे ट्विट कंगनानं केले आहे. त्यामुळे आता संजय राऊत कंगनाला काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. AM News Developed by Kalavati Technologies