भव्य राम मंदिर निर्मितीमुळे कंगना उत्साहित, ट्विटवर लिहिले 'जय श्री राम'

कंगना रनौतच्या डिजिटल टीमने दोन फोटो शेअर केले आहेत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्यात राम मंदिराचे भूमिपूजन सुरु आहे. या ऐतिहासिक भूमिपूजनाच्या प्रसंगी अयोध्या तसेच देशाच्या अनेक भागात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 170 मान्यवर या भूमीपूजनमध्ये सहभागी झालेले आहेत. राम मंदिरात होणाऱ्या भूमिपूजनप्रसंगी बॉलिवूडचे काही स्टार्सही उत्साही दिसले. अनुपम खेर आणि अरुण गोविल व्यतिरिक्त कंगना रनौत यांनीही प्रभू श्रीराम यांच्यावर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कंगना रनौतच्या डिजिटल टीमने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत अयोध्यातील उभारण्यात आलेला मंडप, आणि दुसऱ्या फोटोत राम मंदिर दिसत आहे. कंगनाच्या डिजिटल टीमने हे दोन फोटो शेअर करतांना लिहिले आहे की, "प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने भरलेला असा 500 वर्षाचा प्रवास, जो प्रभू श्रीरामचंद्र यांच्या सभ्यतेची आणि वैभवाची गाथा आणि सांगणारा आहे जय श्री राम"

महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिलापटांचे अनावरण होईल. पंतप्रधान मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराचे भूमिपूजन सुरू केले आहे. या भूमिपूजनप्रसंगी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे कंगना रनौतने गेल्या वर्षी राम मंदिर जन्मस्थळाबद्दल चित्रपटाची घोषणा देखील केली होती. या चित्रपटाची निर्मिती कंगनाच करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies