कोणताही 'शाह' हे वचन मोडू शकत नाही, हिंदी भाषेच्या वादात कलम हासन यांची उडी

अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केले होते. यानंतर हा वाद उफाळून आला.

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन दिले. यानंतर देशभरात राजकीय घमासान सुरू आहे. या विरोधात दाक्षिणेकडी नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. दरम्यान आता दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी ट्विट या वादात उडी घेतली आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून थेट अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

कमल हासन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ते देशात एक भाषा लादण्याचा विरोध करत आहेत. तसेच असे केले तर मोठे आंदोलन केले जाईल असे म्हणत आहेत. कलम हासन व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत की, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन देण्यात आले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही 'शाह', सुल्तान किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. अमित शाह यांना त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

पुढे बोलताना कलम हासन म्हणाले आहेत की, "आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे. जिथे अनेक लो एकत्र बसून जेवण करतात. येथे कोणावरही काही लादता येऊ शकत नाही. तसेच नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा करावी. जलीकट्टूसाठी जे झाले ते फक्त प्रदर्शन होते. मात्र, भाषा वाचवण्यासाठी जे होईल, ते यापेक्षा मोठे असेल अशा शब्दात कमल हासन यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.

अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केले होते. यानंतर हा वाद उफाळून आला. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.AM News Developed by Kalavati Technologies