कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 482 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 हजारांच्या पार

कल्याण डोंबिवली कोरोना रुग्ण संख्येत मोठी झपाट्यानं वाढ झाली आहे

कल्याण |  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज नव्याने 482 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 086 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 140 वर गेलाय.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 236 रुग्ण बरे झाल्यानं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 582 वर पोहचली आहे. सद्यस्थितीला 5 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies