कळमनुरी । लाखो रुपये खर्चूनही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग

शहरात कचऱ्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढले

हिंगोली (शेख वाजेद) । कळमनुरी शहरात स्वच्छ भारत अभियानच्या नावावर लाखो रुपये खर्च होत आहेत. तरीही शहरात जागोजागी कचर्‍याचे डिंग पसरले आहेत. शहरातील अनेक शाळेच्या समोर कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. शहरात जागोजागी कचऱ्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डेंगू सारखे आजार होत आहेत. शहराची सफाईसाठी नगरपरिषद सफाई ठेकेदारांना प्रति महिना 10 लाख रुपए देत आहेत. मात्र, शहरामध्ये सफाई होत नाही. नगरपरिषद व सफाई ठेकेदार मिलीभगत दिसत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिग पसरले आहेत. रास्त्या वरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शहरात स्वच्छ भारत अभियान फक्त बॅनर व नगरपरिषद कर्यालयाच्या कागदावर दिसत आहे. या सफाई वर कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याचे लक्ष नाही. लाखो रुपये खर्च करूनही शहरात सफाई होत नाही. संबंधित सफाई ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies