कायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा

जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती.

औरंगाबाद | औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या पुलावर स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा सकल मराठा समाजाच्या वतीने बसवण्यात आला आहे. मागील वर्षी मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी व आरक्षणासाठी गंगापुर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. त्याला आज एक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी सोमवारी रात्र कायगाव टोका येथील पुलावर काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला.

आज मंगळवारी सकाळी हुतात्मा काकासाहेब शिंदे हुतात्मा स्थळ पुजन व पुष्पाजंली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 47 हुतात्म्यांना सामुहिक श्रद्धाजंली वाहण्यात येणार आहे. यावेळी आतंरराष्ट्रीय किर्तीचे शिवशाहीर सुरेश जाधव यांच्या शिवशाहीर पोवाडे-शहीद गीते सादरीकरण होणार आहे. हुतात्मा काकासाहेब शिंदेसह औरंगाबाद जिल्हातील हुतात्म्यांचा कुटुंबातील सदस्यांचा 'कृतज्ञतापत्र' देऊन सन्मान करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies