पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार जम्बो कोविड सेंटर - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सेंटर उभारण्यात येणार असून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या जागेवर आज पाहणी केली

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरातील नेहरू नगर येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोविड सेंटरच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कोविड सेंटर विषयी माहिती घेत कोविड सेंटरमध्ये उभारणीसाठी मराठी कामगार आहेत का अशी आवर्जून विचारणा केली. दरम्यान; नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये 616 अद्यावत ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies