जिंतूर | बिहार राज्यातील मजूर व विद्यार्थी स्वगृही रवाना

बस व रेल्वेने निशुल्क रवानगी

जिंतूर | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लाॅक डाऊन दरम्यान अनेक राज्यातील मजूर व विद्यार्थी नागरीक हे अडकलेले होते. तसेच जिंतूर तालुक्यात पण विविध राज्यातील मजूर व नागरिक अडकलेली होते म्हणून त्या नागरिकांना त्यांच्या राज्यात व स्वगृह पाठवण्यासाठी महसुल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी पुढाकार घेऊन सोशल डिस्टस चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत बिहार राज्यातील 20 जणांना बस व रेल्वेने पाठवण्यात आले आहे.

जिंतूर तालुक्यात लाॅकडाऊन दरम्यान अनेक राज्यातील मजूर व विद्यार्थी नागरीक अडकलेले असल्याने त्यांनी तहसीलदार सुरेश शेजूळ यांना आपल्या आपल्या राज्यात स्वगृह पाठवण्यासाठी विनंती अर्ज देऊन कळवले होते. त्यामुळे यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यातील नागरिकांना पाठवण्यात आले आहे. जिंतूर बस स्थानकावरून बस क्रमांक एम एच 13 सि यु 8341 या बसने बिहार राज्यातील विविध जिल्ह्यातील 8 मजूर व 12 अरबी मदरसा येथील लोकांना बस मध्ये बसवून त्याच्या सोबत महसुल कर्मचारी देऊन त्याना निशुल्क नांदेड येथे नेऊन रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या श्रमीक रेल्वेने निशुल्क थेट बिहार राज्यातील पटना, भागलपुर, अराय्या जिल्ह्यात स्वगृह रवानगी करण्यात आली आहे. यावेळी मजूर व विद्यार्थी यांच्या चेहर्यावर गावी जाण्याचा आनंद झळकत होता. या मजूरांना रवानगी करण्यासाठी स्वतः तहसीलदार सुरेश शेजूळ सकाळी पाच ते सहा दरम्यान बस स्थानकावर उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies