जालन्यात पुन्हा नव्या 27 रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 580 वर

जालना जिल्ह्याला कोरोनाचा विळखा.

जालना । जालन्यात पुन्हा नव्या 27 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या ही 580 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयानं काल संध्याकाळी 83 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यात 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यामध्ये संभाजी नगर 1, जेसीपी बँक कॉलनी 1, बुऱ्हाण नगर 3, कन्हैया नगर 1, एमआयडीसी 1, बालाजी नगर 1, महावीर चौक 1, साई नगर 1, दाना बाजार 1, जुना जालना 2, गुरु गोवा नगर 2, काद्राबाद 1, निवांत हॉटेल 1, विकास नगर 1, कालीकुर्ती 1, नरिमान नगर 1, नेरू रोड 1, अंबर हॉटेल 1, बागवान मस्जिद 1, तर भोकरदनमधील 2 आणि अंबड तालुक्यातील एकलहेरा 1 आणि देवळगाव राजा इथल्या एकाचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही आता 580 वर जाऊन पोहोचली असून जिल्हा प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.AM News Developed by Kalavati Technologies