जालन्यात आज कोरोनाचे 56 नवे रुग्ण आढळले, सर्वाधिक 47 रुग्ण जालना शहरातील

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 775 वर

जालना । जालन्यात आज सर्वाधिक 56 कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा आता 775 वर जाऊन पोहोचला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने जालन्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयाने 272 संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज सकाळी त्यात 56 रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून अद्याप 109 अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह प्राप्त झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक 47 रुग्ण हे जालना शहरातील आहे. तर बदनापूर 1, घनसावंगी 3, अंबडमधील 4 तर बाजीउम्रद गावातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा आता 775 वर जावून पोहोचला आहे. दरम्यान जालन्यात दिवसेंदिवस झपाट्याने रुग्ण वाढत आहे. मात्र आज इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने जिल्हयात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आतापर्यत 27 जणांचा बळी गेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies