जालन्यात आणखी 25 जणांना कोरोनाची बाधा, एकूण संख्या 110 वर

शंभरी ओलांडल्यानं जालनेकरांत भितीचं वातावरण

जालना | जालन्यात दुपारपर्यंत 25 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जालन्यात भितीचं वातावरण निर्माण झालंय..सकाळी जिल्हा रुग्णालयाला एका 35 वर्षीय होमगार्डचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आला होता. मात्र काही तास उलटात दुपारी आणखी 24 रिपोर्ट पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. याममध्ये जालना एसआरपी मधील एक जवान, मठपिंपळगाव येथील 6, कातखेडा येथील 5, अंबडमधील 5, तर बदनापूरमध्ये एक असे सलग 25 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानं जिल्ह्याची रुग्ण संख्या ही 110 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान शंभरी ओलांडल्यानं जालन्यात भितीचं वातावरण पसरलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies