जालन्यात आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 122 वर

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 122 वर पोहचली आहे.

जालना | राज्यातील कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढत होत आहे. जालन्यातही कोरोना रुग्ण हे सतत वाढत आहेत. आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही आता 122 वर पोहचली आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील 173 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी केवळ पाच संशयीत रुग्णांचे अहवाल जिल्हा रुग्णालयास रात्री उशीरा प्राप्त झाले. ते सर्व पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यात जालना शहरातील मंठा चौफुलीजवळ असलेल्या साईनाथ नगर आणि भोकरदन तालुक्यातील धावडा येथे एक आणि घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील 3 अशा पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 122 वर पोहचली आहे.AM News Developed by Kalavati Technologies