जालना | कंत्राटदार संजय अंभोरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

फरार आरोपी राजसिंग कलाणीला मध्य प्रदेशातील मानपूर येथुन अटक

जालना |  कंत्राटदार संजय अंभोरे खून प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राजसिंग कलाणी असं अटक केल्याल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशच्या मानपूर येथुन अटक केली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरातील कंत्राटदार संजय अंभोरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं होतं. मात्र या हत्यप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला राजसिंग कलाणी तेव्हांपासून फरार झाला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास भोकरदनचे डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान सुनिल जायभाये यांनी फरार आरोपी राजसिंग कलाणीला मध्य प्रदेशातील मानपूर येथुन अटक केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies