जालना ब्रेकिंग! जालन्यात कोरोनाचा कहर सुरुच

आज पुन्हा 69 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1386 वर

जालना । जालन्यात कोरोनाचा कहर सुरुच असून आज पुन्हा तब्बल 69 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 1386 वर जाऊन पोहोचली आहे. जालना येथील प्रयोगशाळा काल कार्यान्वित झाली असून रात्री उशिरा जालना शहरातील 18 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 40 जणांचे निगेटिव्ह आणि तीन रुग्णांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 51 रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून, दोन्ही प्रयोगशाळेचे मिळून तब्बल 69 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

या 51 रुग्णामध्ये जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील एक रुग्ण वगळता उर्वरीत 50 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यात लक्कडकोट 13, संभाजीनगर 11, महसूल कॉलनी 8, मोदीखाना 4, जेईएस कॉलेज जवळ 3, भाग्यनगर आणि समर्थनगर प्रत्येकी 2 तसेच जमुनानगर, अमर छाया टॉकीज जवळ, दुखीनगर, पुष्पक नगर, अजंठा नगर, आणि अर्चनानगर भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची रुग्ण संख्या ही आता 1386 वर जावून पोहोचली आहे.AM News Developed by Kalavati Technologies