जालना ब्रेकिंग! जालन्यात आणखी 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 860 वर

जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली 37 वर, आणखी 8 जणांना कोरोनाची लागण

जालना । जालना जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, 8 नवीन रूग्णांची भर पडली आहे. मृत्यूमध्ये जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील 57 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीला उच्चरक्तदाब व इतर आजारावर उपचार करण्यासाठी 27 जून रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सदर व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवालात स्पष्ट झाले होते. या व्यक्तीवर उपचार सुरू असताना काल गुरुवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर जालना शहरातील पेन्शनपुरा भागातील 60 वर्षीय महिलेला 7 जुलै रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज जालन्यात आणखी 8 नवे रुग्ण सापडले असून, त्यात काद्राबाद चौकातील दोन कुटुंबातील सात जणांचा समावेश आणि बरवार गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 860 इतकी झाली असून त्यापैकी 515 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहे.AM News Developed by Kalavati Technologies