जेएनयू हिंसाचारात गृहमंत्र्यांचा हात, जयराम रमेश यांचा आरोप

रमेश यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की या हिंसाचारामागे गृहमंत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

नवी दिल्ली । एकीकडे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात विद्यार्थ्यांचा निषेध सुरू आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसही सरकारला घेरत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की या हिंसाचारामागे गृहमंत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

ते म्हणाले की, कॅम्पसमध्ये हल्ला करणार्‍या मुखवटा घातलेल्या लोकांना त्वरित अटक केली पाहिजे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. आज जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. कुलगुरूंचा राजीनामा, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई अशी मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. जेव्हा दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना या मोर्चाला परवानगी दिली नाही, तेव्हा बसमध्ये बसून विद्यार्थ्यांना मंडी हाऊसमध्ये नेण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies