जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली सोन्याची जेजुरी, जेजुरीत खंडेरायाच्या गडावर ‘चंपाषष्ठी’ यात्रेची सांगता

आज वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवून घट उठवून सांगता झाली

पुणे | महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज ‘चंपाषष्ठी’ यात्रेची सांगता झाली असून लाखो भाविकांनी आज जेजुरीत दर्शन घेतलं. चंपाषष्ठी यात्रे निमित्त जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचं लोकदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्र जरी पार पडत असल्या तरी विजयाच महाप्रतिक असणर्या “चंपाषष्टी यात्रेला” वेगेळे स्थान आहे. खंडेरायाच्या जेजुरी गडावर सहा दिवस घट स्थापन करून साज-या होणा-या ‘चंपाषष्ठी यात्रेची” आज वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवून घट उठवून सांगता झाली आहे. या वेळी लाखो भाविकांनी गडावर “येळकोट येळकोट जय मल्हार” एकाच जल्लोष केला होता.AM News Developed by Kalavati Technologies