कोरोना व्हायरस : इटलीमध्ये मोडला मृतांचा रेकॉर्ड, एका दिवसात झाला 1000 लोकांचा मृत्यू

एकाच दिवसात येथे 1000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सध्या इटली हे कोरोना व्हायरसचे केंद्र बनले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इटलीमधील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या महामारीमुळे जगात सर्वात जास्त मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. शुक्रवारी इटलीमध्ये विक्रमी मृत्यूंची नोंद झाली. एकाच दिवसात येथे 1000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसचा कहर फक्त इटलीमध्येच नाही. तर सर्व देशांमध्ये आहे. ब्रिटेन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्येही हा आजार झपाट्याने परसरला आहे. संपूर्ण यूरोपमध्ये कोरोना व्हायरसचे 3 लाखांपेक्षा जास्त केस आहेत. एकट्या इटलीविषयी बोलायचे झाले तर कोरोना व्हायरसच्या येथे 86 हजार पॉझिटिव्ह केसेसे आहेत. इटलीमध्ये यापूर्वी गुरुवारी 712 , बुधवारी 683, मंगळवारी 743 आणि सोमवारी 602 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला होता.

जगभरात 5,66,269 लोक कोरोनाबाधित
जगभरात एकूण 5,66,269 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 26 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर यूरोपमध्ये सर्वात जास्त कोरोना व्हायरस पसरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये स्पेनमध्ये 769 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये हा एका दिवसात मृत्यू झालेल्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.

येथे कोरोना व्हायरसच्या केसही वाढल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या 65,059 एवढी झाली आहे. स्पेनमध्ये 8000 नवीन केस आहेत. तर अमेरिकामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 16,000 लोक कोरोनाने ग्रासले आहेत. तर येथे एकूण 85,059 लोकांना कोरोना झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies