सिंचन घोटाळा : अजित पवारांना अमरावती एसआयटी कडूनसुद्धा निर्दोषत्व

शुक्रवारीच नागपूर एसीबीने अजित पवारांना पूर्णपणे क्लिनचिट दिलेली आहे.

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील 28 सिंचन प्रकल्पातील विविध निविदांची चौकशी सुरू होती. आता या चौकशीच्या फेऱ्यात अजित पवार दोषी नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाचे ( एसआयटी) चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून उच्च न्यायालायाच्या नागपूर खडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. सिंचन घोटाळयात अजित पवारांना दोषी धरता येणार नसून ही चुकी अधिकाऱ्यांची असल्याचे उच्च न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शुक्रवारीच नागपूर एसीबीने अजित पवारांना पूर्णपणे क्लिनचिट दिलेली आहे.

नागपूर सिंचन घोटाळ्याचे आरोप पुसले गेल्यानंतर 24 तासांच्या आतच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजून एक दिलासा मिळाला. अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकली आहे. अमरावती विभागाच्या विशेष तपास पथकाकडून जिगाव आणि इतर सहा सिंचन प्रकल्पांमधील गैरव्यवहारामध्ये अजित पवार यांची भूमिका तपासून पाहण्यात आली होती. त्यांना याविषयी प्रश्नावली देण्यात आली होती. त्यावर अजित पवारांनी दिलेली उत्तरं, महाराष्ट्र गव्हर्नमेन्ट रुल्स ऑफ बिजनेस अ‍ॅन्ड इन्स्ट्रक्शन्समधील नियम आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकत नाही असे एसीबीकडून सांगण्यात आले आहे. AM News Developed by Kalavati Technologies