नागठाणा दुहेरी हत्याकांडाची सीआयडीमार्फत चौकशी करा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

पालघर येथील साधू हत्याकांड आणि आता नागठाणा येथील...

उमरी | उमरी तालुक्यातील नागठाणा येथील बालतपस्वी निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या सह अन्य एकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागठाणा येथील निर्वाणी मठाला मारावार यांनी मंगळवारी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि गावकऱ्यांशी चर्चा केली असता हे प्रकरण अंत्यत गुंतागुतीचे दिसले आहे.

पालघर येथील साधू हत्याकांड आणि आता नागठाणा येथील बालतपस्वी निर्वाण रूद्र पशूपती शिवाचार्य महाराज यांची हत्या ही ठाकरे सरकारच्या काळात कटकारस्थान होत असून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा आरोप मारावार यांनी करत साधू संताची हत्या ही अंत्यत दुदैर्वी बाब आहे असे सांगून या प्रकरणाची चौकशी सीआयडीने मार्फत करावी अशी मागणी केली.

राजकीय विषयावर बोलताना मारावार यांनी या घटनेला स्थानिक पोलिस अधिकारी जबाबदार असताना देखील आमदाराची वचक नाही या मतदार संघात भाजपाचा आमदार आहे त्यांच्या मतदार संघात ही अंत्यत दुदैर्वी घटना घडते तेव्हा आपली नैतिकता स्विकारून आमदार राजेश पवार यांनी राजीनामा द्यावा असे सांगून आपण गावातील वास्तव परिस्थिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याचेही मारावार यांनी सांगितले आहे.  या प्रकरणी जबाबदार असलेल्या उमरी पोलिस अधिका-याची दोनच दिवसात हकालपट्टी झाली पाहिजे या बाबतीत आपण जिल्हा पोलिस अधीक्षक व गृहमंत्र्यांनाशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies