भारत-चीन सीमा वाद; डोनाल्ड ट्रम्प म्हणतात अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार

भारत आणि चीनमधील वाढता सीमावाद बघता अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल आहे

नवी दिल्ली | भारत आणि चीनमधील वाढता सीमावाद बघता यावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल आहे. ट्रम्पनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हंटल आहे. की दोन्ही देशाच्या सीमाप्रश्नी आम्ही चर्चा केली आहे. हवे असल्यास अमेरिका सीमा विवादात आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नी तणाव वाढत चालला आहे.  या महिन्याच्या सुरूवातीस, लडाखमध्ये चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक समोरासमोर आले आहेत, चीनमधून सैन्य आणि तळाची संख्या वाढत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतही पूर्णपणे तयार आहे. आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातही या विषयावर चर्चा केली. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी लडाख प्रकरणावर संपूर्ण अहवाल घेतला, त्याशिवाय तीन लष्करप्रमुखांना पर्याय सुचवायला सांगितले. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेदेखील उपस्थित होते. या दरम्यान या विषयावर लष्करप्रमुख, सीडीएस कडून ब्लू प्रिंट मागितला गेला. पंतप्रधान मोदींच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची या विषयावर बैठक झाली आणि लडाख सीमेवर भारत आपल्या रस्त्याचे बांधकाम थांबवणार नाही असा निर्णय घेण्यात आला. वाढता तणाव बघता दोन्ही देशाच्या वादाविवादामध्ये आता अमेरिकेनं मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हंटल आहे. 

भारत अलर्ट मोडमध्ये

पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) च्या बाजूने, चीनकडून सैन्य उपद्रव वाढल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारताने आपल्या सीमेवर रस्ते तयार करण्यास सुरूवात केली आहे. या रस्ते निर्माण करण्याला चीनने विरोध केला आहे. चीनच्या वाढत्या कुरापतीवर भारत सध्या लक्ष ठेवून आहे. अलीकडेच दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवर हालचाल वाढवली आहे. 2017 मध्ये सुद्धा भारत आणि चीनमध्ये डोकलाम वाद निर्माण झाला होता. तसाच वाद आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies