पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

वेस्ट इंडीज संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य दिले होते.

स्पोर्ट्स डेस्क । हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभूत करून तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. केएल राहुल आणि विराट कोहलीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजने दिलेले 208 धावांचे विशाल लक्ष्य गाठले. टी -20 मध्ये भारताने मिळविलेले हे सर्वात मोठे लक्ष्य आहे. यापूर्वी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताने 297 धावांचे लक्ष्य गाठले होते.

रोहित शर्मा 8 धावा काढून बाद झाला. हेटमीयरने त्याला खारी पियरेवर झेलबाद केले. राहुलने कोहलीबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल 62 धावा काढून बाद झाला. पोलार्डच्या हाती त्याला खैरी पियरेने झेलबाद केले.

भारतासमोर 208 लक्ष्य

वेस्ट इंडीज संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडिजकडून शिमरोन हेटमीयरने सर्वाधिक 56 धावा केल्या. याशिवाय केरॉन पोलार्डने 37 आणि इव्हिन लुईसने 40 धावा केल्या.AM News Developed by Kalavati Technologies