जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक; 3 दहशतवाद्यांना जवांनानी घेरले

पुलवामामध्ये सैन्याची दहशतवांद्याशी चकमक सुरू असून, सैन्याने 3 दहशतवांद्याना घेराव घातला आहे

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत पुलवामाच्या मारवेल काकापोरा या भागात काही दहशतवादी लपण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शोधकार्य सुरू असतांना झालेल्या चकमकीत गनफाइट सैन्यातील दोन जवान जखमी झाले आहेत. पोलिस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा घातला असून, दहशतवाद्यांच्या उपस्थितीविषयी विशिष्ट माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केल्यावर ही चकमक सुरू झाली. सुरक्षा जवान त्या ठिकाणी पोहचले असता; लपलेल्या दहशतवांद्यानी गोळीबार सुरू केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या मारवाल भागात चकमक सुरूच असून, पोलीस आणि सुरक्षादल दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर देत आहे.

जम्मू-काश्मीर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात अंसार गजवा-तुल-हिंद (AGH) या दहशदवादी संघटनाशी संबध असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की 'त्राल भागात संशयास्पद आदिल अहमद हजार या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून अवैध हत्यार जप्त करण्यात आले आहे. तसेच दहशतवाद्यांना राहण्याची व अन्य सेवा पुरवण्यास तो मदत करत होता.AM News Developed by Kalavati Technologies