भारतीय रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, सौर उर्जेवर पहिल्यांदाच रेल्वे धावणारा ठरणार पहिला देश

इतिहासात पहिल्यांदाच सौर उर्जेवर रेल्वे गाड्या धावणार

नवी दिल्ली |  प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आता लवकरच सर्वच रेल्वे गाड्या सौर उर्जा शक्तीने धावणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने यासाठी लागणारी तयारी पूर्ण केली आहे. रेल्वेने आपल्या पायलट प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील बीना येथे सौर उर्जा प्रकल्प सुरू केला असून तो 1.7 मेगा वॅट वीज निर्मिती करू शकतो आणि या शक्तीने रेल्वे गाड्या धावण्यास मदत होणार आहे. अभिमानाने भारतीयांची मान उंच करणारी बाब म्हणजे भारतीय रेल्वेचा असा दावा आहे की जगातील इतिहासात ही अशी पहिलीच वेळ असणार आहे जेव्हा सौर ऊर्जेचा उपयोग गाड्या चालवण्यासाठी केला जाईल. या विद्युत केंद्राची खास बाब म्हणजे येथून 25 हजार व्होल्ट वीज निर्मिती केली जाईल जी थेट रेल्वेच्या ओव्हरहेडवर हस्तांतरित केली जातील आणि या मदतीने गाड्या चालवल्या जातील.

BHEL कडून मिळाली मदत

मध्य प्रदेशच्या बीनामध्ये, BHEL च्या सहकार्याने रेल्वेच्या खाली पडून असलेल्या जागांवर 1.7 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. संपूर्ण जगात असा एकही वीज प्रकल्प नाही, ज्यावर ट्रेन चालविली जाऊ शकते. जगातील इतर रेल्वे नेटवर्क मुख्यत: स्टेशन, निवासी वसाहती आणि कार्यालयांची उर्जा आवश्यकतेसाठी सौर उर्जेचा वापर करतात.

भारतीय रेल्वेने काही डब्यांच्या छतावर सौर उर्जा पॅनेल देखील बसवले आहेत, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात वीजपुरवठा होत आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही रेल्वे नेटवर्कने गाड्या चालविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केलेला नाही.

24.82 लाख युनिट वीज निर्मिती होईल

सौर प्रकल्पात डीसी उर्जा निर्माण होईल जे इन्व्हर्टरद्वारे आणि ट्रान्सफॉर्मरद्वारे 25 केव्ही एसीची उर्जा ओव्हर हेडपर्यंत (गाड्यांवरील विद्युत तारा) प्रसारित करते. या सौर प्रकल्पातून वर्षाकाठी 24.82 लाख युनिट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पातून रेल्वेला वार्षिक वीज बिलात 1.37 कोटींची बचत अपेक्षित आहे.

3 गीगावाट पर्यंत वाढेल क्षमता

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकूण 3 गीगावाट क्षमतेची सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. हा उर्जा प्रकल्प थेट इंजिनपर्यंत पोहोचणार आहे. हा प्रकल्प पुर्ण होण्यास अजून तरी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies