मागील दहा वर्षातील सगळ्यात वाईट अवस्थेत पोहचली भारतीय रेल्वे

कॅगचा अहवालाचा सुलभ भाषेत अर्थ आहे, रेल्वे 98 रुपये 44 पैसे लावून केवळ 100 रुपये कमावत आहे

नवी दिल्ली ।  एकीकडे मोदी सरकार देशात बुलेट ट्रेन आणण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे भारतीय रेल्वे गेल्या 10 वर्षातील सर्वात वाईट अवस्थेत पोहोचली असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आधीच अर्थव्यस्थेच्या मुद्द्यावर अडचणीत आलेल्या मोदी सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे. कॅगच्या अहवालानुसार भारतीय रेल्वेची कमाई गेल्या दहा वर्षांत सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये रेल्वेचे ऑपरेटिंग रेश्यो 98.44 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कॅगचा अहवालाचा सुलभ भाषेत अर्थ आहे, रेल्वे 98 रुपये 44 पैसे लावून केवळ 100 रुपये कमावत आहे. म्हणजेच रेल्वेला फक्त एक रुपया 56 पैशांचा नफा होत आहे, जो व्यवसाय दृष्टीकोनातून सर्वात वाईट परिस्थिती आहे. याचा थेट अर्थ असा आहे की रेल्वे सर्व संसाधनांमधून 2 टक्के पैसेही कमवू शकत नाही.कॅगच्या अहवालानुसार तूट होण्याचे मुख्य कारण म्हणजे उच्च वृद्धि दर या अहवालात म्हटले आहे की सन 2017-18 या आर्थिक वर्षात 7.63 टक्के ऑपरेटिंग खर्चाच्या तुलनेत विकास दर 10.29 टक्के होता.

कॅगच्या आकडेवारीनुसार 2008-09 या आर्थिक वर्षात 90.48, 2009-10 मध्ये रेल्वेचे परिचालन प्रमाण 95.28 टक्के, 2010-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85 टक्के, 2012-13 मध्ये 90.19 टक्के, 2013-14 मध्ये 93.6 टक्के, 2014-15 मध्ये 91.25 टक्के, 2015-16 मध्ये 90.49 टक्के, 2016-17 मध्ये 96.5 टक्के, 2017-18 मध्ये 98.44 टक्के टक्के पोहोचले आहे.AM News Developed by Kalavati Technologies