ICC महिला टी 20 वर्ल्डकप फायनल, महिला दिनाला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सामना

ICC महिला टी 20 वर्ल्डकपचा फायनल सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे रंगणार

नवी दिल्ली | ICC महिला टी 20 वर्ल्डकपचा फायनल सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे रंगणार आहे. या वर्ल्डकप सामन्यावर आज विशेष लक्ष राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे. त्यामुळे दोन्हीही संघांचे विजेतेपद पटकावण्याकडे खास लक्ष राहणार आहे. विशेषतः भारतीय महिला संघ हा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला आहे. यापूर्वी भारतीय संघाला फायनलपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे इतिहास रचण्यासाठी भारतीय महिला सज्ज झाल्या आहेत. तर दुसरीकडे बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ हा सहाव्यांदा फायनल खेळण्यास तयार आहे.

ऑस्ट्रेलियाने 4 वेळा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सामन्याची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार 12:30 वाजता सुरू होणार आहे. सलग चार सामने जिंकून भारतीय महिला संघ हा स्पर्धेत अपराजित राहिला आहे. तर आज होणारा फायनल सामना जिंकून भारतीय महिला संघ आपल्या देशवासियांना महिला दिनाची भेट देण्यास तयार आहे. आज महिला दिनानिमित्त जाणून घेऊया भारतीय महिला संघाचा फायनल पर्यंतचा प्रवास कसा झाला.

भारताने स्पर्धेची सुरूवात विजयासह केली होती

1) पहिल्या सामन्यात भारताने ऑस्टेलियाचा 17 धावांनी पराभव केला होता.
2) दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशवर 18 धावांनी विजय
3) तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 3 धावांनी थरारक विजय
4) चौथ्या सामन्यात श्रीलंका वर 7 विकेट्सनी मोठा विजय
5) सेमी फायनल सामना वॉश आऊट ( 'अ' गटात भारत अव्वल स्थानी असल्याने अंतिम फेरीत आगेकूच )

सन 2009 पासून महिला टी 20 वर्ल्डकपचा थरार इंग्लंड मधून सुरू झाला आतापर्यंत 6 वर्ल्डकप स्पर्धा झाल्या आहेत. या सहा स्पर्धा कोणत्या देशात खेळवण्यात आल्या. कोणत्या संघाने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली आहे. ते आपण जाणुन घेऊया.

ICC महिला टी 20 वर्ल्डकपचा इतिहास
वर्ष स्थान विजेता संघ उपविजेता संघ
2009 इंग्लंड इंग्लंड न्युझिलंड
2010 वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया न्यूझिलंड
2012 श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड
2014 बांग्लादेश ऑस्ट्रेलिया इंग्लंड
2016 भारत वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया
2018 वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया इंग्लंड
2020 ऑस्ट्रेलिया - -

टीम इंडियाचा वर्ल्डकप सुरू झाल्यापासूनचा प्रवास नेमका कसा आहे त्यावर एक नजर टाकुया

1) 2009 सेमी फायनल पर्यंत

2) 2010 सेमी फायनल पर्यंत

3) 2012 प्राथामिक फेरीत बाद

4) 2014 प्राथामिक फेरीत बाद

5) 2016 प्राथामिक फेरीत बाद

6 2018 सेमी फायनल पर्यंत

आतापर्यंतचा टी 20 वर्ल्डकपचा इतिहास बघता ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक चॅम्पियन बनण्याची कामगिरी केली आहे. त्यात भारतीय महिला संघाला एकदाही फायनल खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे भारतीय महिलांना या फायनल सामन्यात मोठी कसरत करावी लागणार आहे. भारताची मदार नेमक्या कोणत्या खेळाडूंवर असणार आहे त्यावर एक नजर टाकुया.

1) हरमनप्रित कौर - भारताची पहिली महिला खेळाडू जिने टी 20 मध्ये भारताकडून पहिले शतक झळकवले आहे. भारताची रन मशिन म्हणुन तिची ओळख आहे. तसेच भारतीय संघाची कॅप्टन दोन्ही महत्वाच्या जबाबदाऱ्या हरमनप्रित कौरला पार पाडाव्या लागणार आहे. तिच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल

2) स्मृती मानधना - स्टायलिश डावखुरी फलंदाज अशी ओळख असणारी फलंदाज गेल्याच वर्षी आयसीसीचे दोन पुरस्कार तिच्या नावावर आहे. अर्जुन पुरस्कारने संम्मानित नेहमीत. भारतीय संघाकडून खेळतांना नेहमी चांगली कामगिरी करते. तिच्यावरही भारतीय संघाची मदार असणार आहे. यंदाच्या वर्डकपमध्ये फॉर्म चांगला नाहीये पण आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल.

3) जेमेमा रॉड्रीक्स - सतत सोशल मिडीयावर जेमेमाचे नाव असते चांगली खेळाडू आहे. तिने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. फायनल सामन्यात सुद्धा तिच्याकडून अशाच कामगिरीची आशा भारतीय संघाला असेल.

4) शैफाली वर्मा - हरियाना हॅरीकेज या नावाने प्रसिद्ध आहेत. 16 वर्षाच्या या खेळाडूने विरोधी टीमच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. अगदी 16 वर्षाच्या या खेळाडूने आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. भारताकडून सलामीला येते. आक्रमक खेळी असा तिचा अंदाज आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरूवात करून देण्यास तयार आहे.

5) रिचा घोष - पश्चिम बंगालच्या या महिला खेळाडुचे वय 16 वर्ष आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि विकेटकिपरींग तिनही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करते. चांगल्या खेळामुळे तिला टी 20 स्पर्धेत संधी दिली गेली आहे. फायनल मध्ये जर संधी मिळाल्यास नक्कीच त्याचे सोने करण्यास तयार आहे.

6) पुजा वस्त्राकर - भारताची जलद गोलंदाज, मध्यप्रदेशकडून खेळतांना चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळेच या खेळाडूला संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियातले मैदान जलद गोलंदाजांना मदत करते त्यामुळे पुजाची कामगिरी महत्वाची राहणार आहे. आज तिच्यावर खास लक्ष असेल.

7) दीप्ती शर्मा - भारताची स्पीन गोलंदाज आहे. दीप्तीने आपल्या फिरकिच्या जाळ्यात स्पर्धेतील अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. सध्या जागतीक क्रमवारीत 4 नंबरवर आहे. टी 20 स्पर्धेत नंबर 2 क्रमांकाची गोलंदाज आहे. आज जास्तीत जास्त बळी मिळवून दीप्ती शर्माला स्पर्धेतील नंबर 1 गोलंदाज बनण्याची संधी आहे.

8) तानिया भाटीया - विकेटकिपर फलंदाज तानियाचा यष्टीमागचा खेळाने सगळ्यांनाच चक्रावून टाकले आहे. आतापर्यंत स्पर्धेत विकेटकिपर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मात्र फलंदाज म्हणून अपयशी ठरली आहे. फायनल सामन्यात चांगला खेळ करून आपल्या संघाला जेतेपद जिंकून देण्यास सज्ज आहे.

9) शिखा पांडे - अनुभवी फास्ट गोलंदाज आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीने शिखाने भारतीय संघाला फायनल पर्यंत पोहचवण्यास मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात शिखाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. फायनल मध्ये चांगली गोलंदाजी केल्यास भारताच्या पदरात वर्ल्डकप पडू शकतो.

10) वेदा कृष्णमुर्ती - तुफानी फलंदाजी करण्यासाठी वेदाचे नाव घेतले जाते. आतापर्यंत वेदाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आज तिच्या कामगिरीवर भारतीय संघाच्या आशा लागून आहे. कशी फलंदाजी करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

11) हर्लींन कौर - टी 20 स्पर्धेची फलंदाज कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करणे तिला आवडते स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी आहे. आज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून भारतीय संघाला विजेतेपद मिळून देण्याची संधी तिच्याकडे आहे.

12) पुनम यादव - या वर्ल्डकप स्पर्धेत तिच्या गोलंदाजीचा सामना करणे चांगल्या चांगल्या फलंदाजांना जमले नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. पुनमचे 4 षटकं भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. फिरकी गोलंदाज आहे फायनल सामन्यात चांगली कामगिरी करून स्पर्धेतील सर्वत्कृष्ट गोलंदाज बनण्याची पुनम यादवला संधी आहे. आणि नक्कीच संधीचे सोने करणे पुनमला येते. त्यामुळे तिच्या कामगिरीवर सुद्धा भारताची मदार आहे.

13) अरुंधती रेड्डी - क्रिकेट खेळण्यास हैदराबाद कडून सुरूवात केली नंतर रेल्वेकडून खेळतांना तिने चांगली गोलंदाजी केली आहे. याच बळावर भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. आज जर खेळण्याची संधी मिळाली तर चांगली कामगिरी करण्यास तयार आहे.

14) राजेश्वरी गायकवाड - अगदी काही दिवसांपुर्वी वडीलांचे निधन झाले आहे. एवढे दु:ख पेलून सुद्धा तिने क्रिकेटमधील संयम गमावला नाही. चांगली गोलंदाजी करते. राजेश्वरीकडे चांगला अनुभव आहे. तिचा अनुभव फायनल सामन्यात भारताच्या नक्की कामात येणार आहे. तसेच राजेश्वरीला आपल्या वडीलांचे स्पन्न पुर्ण करण्याची संधी आहे. त्यामुळे आज तिला चांगला खेळ करावा लागणार आहे.

15) राधा यादव - उत्तर प्रदेश मधील राहणारी आहे. चांगलं क्रिकेट खेळते डावखुरी फिरकी गोलंदाज आहे. सध्या मुंबईकडून खेळते आहे. भारतीय संघात तिची गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीवर सुद्धा लक्ष असणार आहे.

या आहे भारताच्या 15 शिलेदार यांच्या बरोबरच भारतीय महिला संघाचे कोच एस रमन सध्या मुख्य प्रशिक्षक आहे. नरेंद्र गिडवाणी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. ही सगळी भारतीय टीम फायनल खेळण्यास उत्सुक आहे. महिला दिन असल्यामुळे भारतीय महिला या संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघांला जर ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचे असेल तर सांघीक कामगिरी करावी लागणार आहे.

सामन्याची वेळ आज दुपारी 12:30 वाजता मेलबर्न (एमसीजी)AM News Developed by Kalavati Technologies