काश्मीरप्रश्नी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही, भारताने अमेरिकेला खडसावले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर प्रश्नावर तृतीय पक्षाची कोणतीही भूमिका नाही.

नवी दिल्ली ।  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात काश्मीरबद्दल विचार करीत आहोत आणि जर आम्ही मदत करू शकलो तर नक्कीच करू. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारताने आता कडाडून प्रतिक्रिया दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर प्रश्नावर तृतीय पक्षाची कोणतीही भूमिका नाही. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काश्मीर प्रश्नाबाबत आमची भूमिका आणि त्यातील मध्यस्थी पूर्णपणे स्पष्ट आहे. या प्रकरणात कोणत्याही तृतीय पक्षाच्या भूमिकेची आवश्यकता नसल्याचे मी पुन्हा पुन्हा सांगतो.AM News Developed by Kalavati Technologies