नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान इमरान खान यांनी काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली. यावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मीर प्रकरणी अमेरिकेकडे मदत मागितल्याचा खोटा दावा केला होता. आता भारताने हा खोटा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन हा दावा फेटाळला.
याविषयावर ट्विट करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेकडे काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. मात्र या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे कोणतीही मदत मागितली नसल्याचे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलल्याचे स्पष्ट झाले आहे.

...that all outstanding issues with Pakistan are discussed only bilaterally. Any engagement with Pakistan would require an end to cross border terrorism. The Shimla Agreement & the Lahore Declaration provide the basis to resolve all issues between India & Pakistan bilaterally.2/2
— Raveesh Kumar (@MEAIndia) July 22, 2019
भारत-पाकिस्तानचा काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर पाकिस्तानला सर्वात आधी दहशदवाद थांबवावा लागेल. पाकिस्तानसोबतच काश्मीरप्रश्नी द्विपक्षीय चर्चा व्हावी हेच भारताचे आतापर्यंतचे धोरण राहिले आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी डोनाल्ड ट्रम्पकडे याविषयी मदत मागितली. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनीही खोटा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी आमच्याकडे मदत मागितली असल्याचे ते म्हणाले. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.