भारतात सव्वा लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण, तर आतापर्यंत 3720 जणांचा मृत्यू

. दिलासादायक म्हणजे 51784 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्ली | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 6,654 कोरोना पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. तर 137 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. आता देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 1,25,101 एवढी झाली आहे. यामधील 69597 केस या अॅक्टिव्ह आहेत. तर कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या ही 3720 झाली आहे. दिलासादायक म्हणजे 51784 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.

तर दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांच्या आत 14 नवीन हॉटस्पॉट बनले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधित हॉटस्पॉटचा रेकॉर्ड आहे. यासोबतच आता दिल्लीमध्ये कंटेनमेंट झोनची एकूण संख्या वाढून 92 वर गेली आहे. दरम्यान दिल्लीचा एक परिसर कंटेनमेंट झोनच्या लिस्टमधून बाहेर पडला आहे.

यापूर्वी गुरुवारी कोरोना व्हायरसमुळे 148 जणांचा मृत्यू झाला होता. याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले होते की, गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून 148 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नवीन 6,088 कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 40.97 टक्के कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये विदेशी लोकांचाही समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies