महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण, देशातील आकडा 694 वर, तर 16 जणांचा मृत्यू

देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना केसेस समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच आहे. विविध राज्यांमधून कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 40 पेक्षा जास्त नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 24 तासात चार कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना वारंवार घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 694 वर पोहोचली आहे. तर देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना केसेस समोर आल्या आहेत. येथे 125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 16 जणांना जीव गमवावा लागला आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील असा :

पिंपरी चिंचवड मनपा 12
पुणे मनपा 18
मुंबई 49
सांगली 9
नवी मुंबई , कल्याण डोंबिवली 6
नागपूर 5
यवतमाळ 4
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी 3
सातारा, पनवेल प्रत्येकी 2
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी १
एकूण 125
मृत्यू 4
18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 125 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies