आम्हा दोघांमध्ये तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही, चीनने ट्रंप यांची ऑफर धुडकावली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास आहोत असं ट्वीट करून म्हंटल होतं.

नवी दिल्ली |  भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या वादावर अमेरिकेची मध्यस्थी करण्याची तयारी चीनने धुडकावून लावली आहे. चीन आणि भारतामध्ये कुणी तिसऱ्याने मध्यस्थी करायची गरज नाही, अशा शब्दांत चीनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं धुडकावून लावलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना चीनचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी अमेरिकेची मध्यस्थीची ऑफर धूडकावून लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाप्रश्नावरून वाद चिघळला आहे. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास आहोत असं ट्वीट करून म्हंटल होतं. मात्र चीनने आम्हां दोघात तिसऱ्याची गरज नाही आमच्या सीमावादावर आम्हीच तोडगा काढू स्पष्ट केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies