भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा, मालिकेत 5-0 अशी क्लीन स्वीप

न्यूझीलंडने तीन किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय टी -20 मालिकेतील सर्व सामने कधीही गमावले नाहीत

स्पोर्ट्स डेस्क ।  भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने दणदणी विजय मिळवून 5 सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकून न्यूझीलंडच्या धुव्वा उडवला आहे. टी -20 मालिकेचा अंतिम सामना रविवारी (2 फेब्रुवारी) माउंट मुंगुईच्या बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले चार सामने जिंकून भारत मालिकेत 4-0 ने आघाडीवर आहे. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला हरवून भारताने शेवटचे दोन टी -20 सामने जिंकले. भारत प्रथमच पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत,  भारताकडे 5-0 असा विजय मिळवण्याची उत्तम संधी होती ती भारताने साधली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने तीन किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय टी -20 मालिकेतील सर्व सामने कधीही गमावले नाहीत.

माउंट मौनगुनी येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 7 धावांनी पराभूत केले. यासह भारताने न्यूझीलंडला 5-0 ने धुडकावले. टीम इंडियाने माउंट मौनगुनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी -२० सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 विकेट गमावल्यानंतर 163 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 9 विकेट गमावून 156 धावाच करू शकला. प्रथमच, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी -20 मालिका खेळली गेली, ज्यात भारताने मालिकेतील सर्व सामने जिंकून इतिहास रचला.AM News Developed by Kalavati Technologies