चीनला भरणार धडकी, राफेलनंतर रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमानं

यासंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली.

नवी दिल्ली | लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षादरम्यान भारताने आता सावधगिरी बाळगली आहे. चीनच्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय यंत्रणा सज्ज झाली असून भारताने आता रशियाकडून 33 लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 21 मिग -29 आणि 12 सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमान खरेदी केले जातील. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. या दरम्यान पुतीन म्हणाले की ते दोन्ही देशांमधील विशिष्ट सामरिक भागीदारीसाठी वचनबद्ध आहेत. द्विपक्षीय करारांना गती देण्यास दोन्ही नेते सहमत आहेत. यावर्षी भारतात दोन्ही देशांची द्विपक्षीय शिखर परिषद होणार आहे.

दिवसेंदिवस सीमेवरील वाढता तणाव 

दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे चीनने सैन्य वाढवले असल्याची माहिती आहे. गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराने सुद्धा आता कंबर कसली आहे. भारतीय लष्कराची मोठी फौज सध्या गलवान घाटीत चीनच्या कुरापतीवर लक्ष ठेऊन आहे. शिवाय जमीनीवरुन आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, विमानविरोधी बंदुकाही तैनात करण्यात आल्या आहेत. तिकडे चीनने अक्साई चीनमधील खुर्नक किल्ल्यावर मोठ्या संख्येने सैन्यबळ उभे केले आहे. मोठ्या संख्येने रॉकेट फोर्सही एलएसीवर आणण्यात आले आहेत.

गॅलवान खोऱ्यात चीनने लांब पल्ल्याच्या जमिनीवरुन हवेत मारा करणारे HQ-9 आणि HQ-16 क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. HQ-9 क्षेपणास्त्राची रेंज 200 किमी आहे आणि या क्षेपणास्त्राचा रडार फायटर विमान, हेलिकॉप्टर, स्मार्ट बॉम्ब किंवा ड्रोन सहज पकडू शकतो. HQ-16 हे मध्यम-श्रेणीचे क्षेपणास्त्र 40 किमी पर्यंतचे क्षेपणास्त्र आहे. जे जमिनीवरुन हवेत मारा करु शकते, चीन आपल्या रॉकेट फोर्सवर सर्वाधिक अवलंबून आहे. 2016 चीनने मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स ((पीएलएआरएफ) ची स्वतंत्र संस्था म्हणून स्थापना केली होती.

सध्या त्यांच्याजवळ जगातील सर्वात मोठा रॉकेट साठा आहे. एलएसी जवळील अशा ठिकाणी चीनने आपली जबरदस्ती तोफखानाही तैनात केली आहे जेथून गॅलवान खोरे आणि पॅंगांग तलावाच्या काठावर असलेल्या भारतीय लष्कराच्या तळांवर सहज गोळीबार केला जाऊ शकतो.AM News Developed by Kalavati Technologies