कोरोनाविरूद्धच्या लढाईत अमेरिका भारताच्या मदतीला, 29 लाख डॉलर्सची देणार मदत

कोरोनाविरुद्ध लढाईत अमेरिकेची भारताला मोठी मदत, 29 लाख डॉलर्स देण्याची घोषणा

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकेने भारताला 29 लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. भारताबरोबरच इतर कोरोना बाधित देशांना 17.4 कोटी डॉलरची अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे. संपुर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे देशांची अर्थव्यवस्था कमजोर होत असतांना अमेरिकेने जगातील सर्व देशांना अर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. या रकमेपैकी 29 लाख डॉलर्सची मदत भारताला मिळणार आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात भारताला जाहीर केलेल्या 10 कोटी डॉलर्सच्या व्यतिरिक्त ही मदत जाहीर केली आहे. सध्या जाहीर केलेली नवीन रक्कम रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यासह विविध विभाग आणि एजन्सींच्या यूएस जागतिक प्रतिसाद पॅकेजचा एक भाग आहे. ही आर्थिक मदत जागतिक महामारीचा धोका असलेल्या 64 सर्वाधिक जोखमीच्या देशांना आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की ते प्रयोगशाळेतील यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी, आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच कोरोनाशी दिल्या जाणाऱ्या लढ्यांसाठी वैज्ञानिकांना या रकमेतून मदत मिळणार आहे.

यूएस आंतरराष्ट्रीय विकास एजन्सी (यूएसएआयडी) च्या उप प्रशासक बोनी ग्लिक यांच्या मते, ही नवीन मदत अमेरिकेचे जागतिक आरोग्य नेतृत्व आणखी मजबूत करेल. आर्थिक पाठिंबा जाहीर करण्याव्यतिरिक्त, अमेरिका आपल्या मित्र आणि सहकारी देशांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्यास ती देखील पुरवण्यास तयार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प म्हणाले की मोठ्या संख्येने नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अमेरिकेने व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढविले आहे. अमेरिकेमध्ये बनवण्यात आलेले व्हेंटिलेटरचे इतर देशांमध्येही त्यांचे वितरण करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies