इंदापूर | राज्यमंत्री दत्ता भरणेंच्या विनंतीला वालचंद इंडस्ट्रीजचा ग्रीन सिग्नल

इंडस्ट्रीज चे हाॅस्पिटल लोकहितार्थ वापरास देण्याची कंपनीची घोषणा

इंदापूर (देवा राखुंडे) | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीला मान देत वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेडने वालचंदनगर येथील स्वमालकीचे ४० बेडचे अत्याधुनिक हाॅस्पिटल कोरोनाच्या रुग्णांकरिता वापरात देण्याचे नुकतेच जाहीर केले.

सध्या कोरोना या विषाणूने जोर धरल्याचे दिसून येतेय. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. तर मुंबई ने उच्चांक गाठला असून त्याखालोखाल पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येतेय. इंदापूर तालुक्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र असे असले तरी पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदापुरमध्ये हा विषाणू पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून अशा वेळी उपाययोजना म्हणून दत्तात्रय भरणे यांनी वालचंद इंडस्ट्रीज लि.या वालचंदनगर येथील कंपनीकडे त्यांचे सुसज्ज हाॅस्पिटल लोकहितार्थ वापरासाठी मागितले होते. देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा विचार करता, राज्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीला कंपनीच्या वतीने ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तसे पत्र कंपनी व्यवस्थापनाने राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे दिले आहे.

यावेळी वालचंदनर कंपनीचे डीजीएम धीरज केसकर, नगरकर,जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलिप पवार, वालचंदनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड,राजेश जामदार,शैलेश फडतरे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकिय कर्मचारी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies