Ind Vs Aus । भारताचे ऑस्ट्रेलियाला 256 धावांचे आव्हान

टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीकडून चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही

स्पोर्ट्स डेस्क ।  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीस आला आणि 49.1 षटकांत 255 धावांपर्यंत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 74 धावा केल्या तर केएल राहुलने 47 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने तीन गडी बाद केले. पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले.

टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीकडून चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. पाचव्या षटकातील तिसर्‍या बॉलवर मिशेल स्टार्कने रोहित शर्माला बाद केले. मिशेल स्टार्कने रोहित शर्माला डेव्हिड वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. रोहित शर्मा 10 धावा काढून बाद झाला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी 121 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच भारत 255 धावापर्यंत मजल मारू शकला.AM News Developed by Kalavati Technologies