पंढरपुरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

लॉकडाऊनच्या काळात पाच रुपयांना ही थाळी मिळणार आहे

पंढरपूर | पंढरपूर शहरात दोन ठिकाणी शिवभोजन केंद्राची सुरवात झाली आहे. या केंद्राचे उद्घाटन आमदार भारत भालके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रशांत खलिपे, प्रशांत खुळपे, संदीप मांडवे आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात पाच रुपयांना ही थाळी मिळणार आहे. शहरातील जनकल्याण हॉस्पिटल समोर साई हॉटेल आणि पश्चिम द्वारला येथे ही दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याठिकाणी दररोज १५० जणांच्या भोजनाची सोय करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies