Unlock 3.0 : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 'मेट्रो ट्रेन' आणि 'शाळा' राहणार बंद..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा न सुरु करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली । कोरानाचा भारतात शिरकाव झाल्याने भारत सरकारने लॉकडाऊन ही संकल्पना देशात लागू केली होती. त्यामुळे सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंदे पुर्णत: ठप्प पडले होते. लॉकडाऊनच्या चार टप्प्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी पुन्हा सरकारने अनलॉकची घोषणा केली होती. मागील 2 महिन्यापासून अनलॉक 1 आणि 2 ची सुरुवात झाली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुट सुद्धा देण्यात आली होती. आता पुन्हा ऑगस्टमध्ये अनलॉक 3 ची घोषणा होणार आहे. त्यामध्ये मुख्यत: शाळा सुरु करण्यावर निर्णय घेण्यात येणार होता मात्र आता शाऴा सुरु करण्याच्या निर्णयाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. तसेच शाळा व्यतिरिक्त मेट्रो ट्रेन सुद्धा सुरु होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies