राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 335 वर, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा...

राज्यात आज 33 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर 3 जणांचा मृत्यू झालाय

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचे 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यावरून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 335 वर पोहचली आहे. आजच्या या 33 रुग्णांपैकी 30 रुग्ण एकट्या मुंबईतले आहे. तर 2 रुग्ण पुण्यात आणि 1 रुग्ण बुलडाण्यात आढळून आला आहे. या आजाराने आज 3 जणांचा बळी घेतला आहे. या तीन जणांमध्ये मुंबईतले 2 रुग्ण तर, पालघरमधील 1 रुग्ण आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मनपानिहाय 

मुंबई - 181

पुणे शहरी ग्रामीण - 50

सांगली - 25

मुंबई वगळता, इतर परिसर - 36

नागपूर - 16

अहमदनगर - 8

यवतमाळ - 4

बुलडाणा - 4

सातारा, कोल्हापूर प्रत्येकी 2 - 2

तसेच औरंगाबाद रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिकमध्ये प्रत्येकी 1 - 1 रुग्ण आहेत.AM News Developed by Kalavati Technologies