चिंता वाढली! औरंगाबादेत आणखी 35 रुग्णांची भर, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 8743 वर

सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 35 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3338 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 35 रुग्णांचे (20 पुरूष, 15 महिला) अहवाल आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8143 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4463 बरे झाले असुन, 342 जणांचा मृत्यू झाला. तर 3338 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण : (15)

शंभू नगर (1), एन तेरा, वानखडे नगर, हडको (1), गारखेडा (2), नागेश्वरवाडी (1), जालना रोड (1), एन पाच सिडको (1), हतनूर वस्ती (1), मछली खडक (1), निराला बाजार (2), जरीपुरा (1), कांचनवाडी (1), किराणा चावडी (1), औरंगपुरा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (20)

गेवराई, पैठण रोड (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), मातोश्री नगर, रांजणगाव (3), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), गणेश वसाहत, वाळूज (1), नागापूर, कन्नड (2), हतनूर, कन्नड (1), बनशेंद्रा, कन्नड (1), ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर (3), माऊली नगर (1), साकेगाव, बोरसर (1) सफियाबाद वाडी, बोरसर (2), दुर्गा नगर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.AM News Developed by Kalavati Technologies