राज्यात गेल्या 24 तासात 19,164 कोरोनाबाधितांची भर, तर 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या 24 तासात 19,164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं राज्यात सुमारे 12 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान सुमारे 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 9 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 19 हजार 164 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 12 लाख 82 हजार 963 एवढा झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 74 हजार 993 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 34 हजार 345 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 9 लाख 73 हजार 514 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies