सोलापूर कोरोना : सोलापूरात गेल्या 24 तासात 345 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 10 हजार 554 वर

जिल्ह्यात सध्या 3138 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10 हजार 554 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 345 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 10 हजार 554 वर पोहोचला आहे. सध्या 3138 जणांवर उपचार सुरू असून, 6887 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णासंख्या हा सोलापूरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.AM News Developed by Kalavati Technologies