सातारा जिल्ह्यात आज 200 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 163 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

सातारा | जिल्हात आज 200 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 379 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सद्यस्थितीला 2 हजार 723 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

464 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, कोरेगांव 12, वाई येथील 29, शिरवळ-खंडाळा येथील 76, रायगाव येथील 21, पानमळेवाडी येथील 107, मायणी येथील 39, महाबळेश्वर येथील 11, पाटण येथील 43, दहिवडी येथील 12, खावली येथील 3, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 62 असे एकूण 464 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितलेAM News Developed by Kalavati Technologies