मेहकर पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव; एका अधिकाऱ्यासह 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी विलगीकरणात, मेहकर पोलीस स्टेशनचा कारभार जानेफळ पोलीस स्टेशनकडे सोपवले

बुलडाणा । बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मेहकर पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. अधिकाऱ्यासह सर्व 50 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, या पोलीस स्टेशनचा कारभार जानेफळ पोलीस स्टेशनकडे देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी. तडवी यांनी ही माहिती दिली आहे. मेहकर पोलिस स्टेशनचा 1 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. या ठाण्यात अधिकारी व कर्मचारी मिळून 54 जण आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना मेहकर येथे कोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची रॅपीडटेस्ट होणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies