महाराष्ट्रात 'भाभीजी का पापड' खाऊन लोकं बरे झाले का? संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले

राज्यसभेत आज कोरोनाच्या प्रश्नावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले होते, मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना 'भाभीजी पापड' म्हणत त्यांची बोली बंद केली

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या 24 तासात 97,894 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1132 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 51,18,254 एवढा झाला आहे. राज्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. असे विरोधी पक्ष वारंवारं ठाकरे सरकारवर टिका करत आहे. अशा टिका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले आहे. महाराष्ट्रातून बरेच लोक कोरोनापासून बरे होत आहे. महाराष्ट्र सरकारवर टिका करणाऱ्या प्रत्येकांने हे लक्षात घ्यावे की, लोकं "भाभीजी का पापड खाऊन बरे होतात का" असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. आई आणि भावाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकं बरे होत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने देखील मुंबईतील धारावीचे कौतुक केले आहे. मी विरोधकांना मला विचारायचे आहे की, इतके लोकं महाराष्ट्रात बरे कसे होत आहे. ते का 'भाभीजी का पापड' खाऊन बरे झाले आहे का? हि लढाई राजकीय नसून, जनतेची जीव वाचवण्याची लढाई आहे. असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान, भाजपचे केंद्रिय मंत्री अर्जून मेघवाल यांनी सांगितले होते की, "पापड खाओ और कोरोना भगाओ" मात्र काही दिवसानंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली होती.AM News Developed by Kalavati Technologies