लातूरात मृत कोरोनाबाधित महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला

मृत्यू बाबत डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले नसल्याने, रागाच्या भरात कोरोनाबाधित मृत महिलेच्या मुलाने केला डॉक्टरवर हल्ला

लातूर । लातूर शहरातील सकाळी आज खळबळजनक घटनेने गाजली. उदगीर येथील 60 वर्षीय महिलेला धाप लागत असल्याने उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सदर महिलेची प्रकृती खालवत चालल्याने त्या महिलेला लातूर येथील अल्फा हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरू असताना काल रात्री त्या महिलेचा मृत्यू झाला.

याबाबतीत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिली नाही हा राग अनावर न झाल्याने मृत कोरोनाबाधित महिलेच्या मोठ्या मुलाने अल्फा हॉस्पिटलमधील डॉ.दिनेश वर्मा यांच्यावर चाकूचा हल्ला केला आहे. या हल्यात डॉ. वर्मा जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies