जालन्यात पुन्हा सात रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह

जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 84 वर

जालना | जिल्ह्यात आणखी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 84 वर जावून पोहोचली आहे. जिल्हा रुग्णालयानं 186 संशयितांचे अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यात 125 जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला होता. त्यामुळं जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. मात्र काही तासानंतर उर्वरित संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात सात नवीन रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आलेत. यामध्ये याआधी रुग्ण आढळून आलेल्या जुना जालना भागातील प्रतिष्ठीत खाजगी रुग्णालयतील आणखी चार कर्मचार्यांचा समावेश आहे. तर घनसावंगी तालुकयातील पीरगेबवाडी इथे एक, खापरदेव हिवरा एक आणि जालना तालुक्यातील वखारी वडगाव इथे एक असे सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामुळं जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या ही 84 वर पोहोचली असून जालना जिल्हा आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.AM News Developed by Kalavati Technologies