बीडमध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णामुळं 12 गावं राहणार आठ दिवस बंद

जिल्ह्यात आठ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे.

बीड | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं असतांना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाचा बीड शहरासह विविध गावांतील अनेकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क आला असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून बीडसह काही गावे कंन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. तसेच पुढील आठ दिवस जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

माहितीनुसार पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील एका व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील व्यक्तीचा बीड शहरातील व आसपासच्या काही गावांतील अनेकांनी संपर्क आल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तसा अहवालही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण व इट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव या गांवामध्ये आठ दिवसांसाठी संचारबंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies