औरंगाबादेत आणखी 27 जणांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 507 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यातील 27 रुग्णांचे अहवाल दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 567 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 हजार 521 बरे झाले तर 507 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3539 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (16)

शंकुतला नगर, गादिया कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर (1), प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा (1), ब्ल्यू बेरी (2), वृंदावन कॉलनी (1), गरम पाणी (1), शमी कॉलनी (1), अन्य (5), विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको (1), कोहिनूर कॉलनी (1)

ग्रामीण (11)

खंडाळा (1), खालचा पाडा, शिवूर (9), बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील 82, फुलंब्री तालुक्यातील पाडळी बोरगाव येथील 51, कन्नड तालुक्यातील लंगोटे महादेव रोड, शिव नगरातील 74 वर्षीय पुरूष आणि शहरातील मुकुंदवाडीतील संघर्ष नगरातील 53 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies